Basics of IT Services

Introduction to ITIL v3

Advertisements

स्वप्न

स्वप्न असावे अकाशासारखे, पाहतच राहावे आणि कधी संपूच नये
अनेकानेक रंगांनी सजलेले, रोज नवे आकार घेणारे
त्या स्वप्नामध्ये असावा एक सूर्य, ते स्वप्न उज्वल आणि प्राणवत करण्यासाठी
असावा एक चंद्र शांतता आणि मनाला विश्रांती देणार

त्याला नको दिशा किंवा दशा, सगळीकडे पहावं एकाच दिसणारं
त्याला नको भूतकाळ किंवा भविष्य नसावा तो वर्तमानही
झुगारून द्यावीत त्यांनी वास्तविकतेची बंधनं आणि सभ्यतेची चादर
झेप घ्यावी त्याने क्षितिजापार कधीही ना पाहिलेलं न समजलेलं अस काहीतरी असावं त्या स्वप्नात

~प्रसाद देशपांडे

शोध

शोध

प्रत्येक जण काही ना काही शोधातय.
कुणी हिमालय शोधतोय तर कुणी देवालय शोधतोय
कुणी शोधतोय क्षितिजा पलीकडचं जग, कुणी शोधतोय अंतरंगातलं बीज
कुणी शोधतोय जागा दोन शब्द बोलायला, कुणी शोधतोय फक्त एकांत
कुणाला हवाय भोग विलास अमर्याद सुखाचा, कुणाला हवय औषध आयुष्यभर वेचलेल्या दुःखांवर लावायला

सापडेल याची खात्री नाही पण शोध मात्र सुरु आहे
मृगजळाच्या शोधात आयुष्य निघून जाते पण हाती काही लागत नाही
आणि हाती लागलाच तर त्याचा उपभोग नवीन शोधला कारणीभूत ठरेल
कदाचित शोध हाच जीवनाचा मूलमंत्र असावा

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, वयाच्या प्रत्येक टप्प्यावर, शरीराच्या प्रत्येक नव्या सुरकुतीवर, आणि अनुभवाच्या प्रत्येक साक्षात्कारावर शोध हा आहेच.
त्याला टाळून चालणार नाही, फार फार तर शोध लांबवता येईल, शोध नाकारता येईल पण टाळता येणार नाही
शोधामध्ये प्रवास असेल, शोधामध्ये यातना असतील, कदाचित कधीच न अपेक्षिलेल दुःख असेल, पण या शोधरूपी डोहा पडीकले असेल ते समाधानाचे जंगल
संपूर्ण शीण घालवायला, नवी उमेद मिळवायला आणि पुढच्या शोधाची शिदोरी बांधायला

या प्रवासात नवीन चेहरे भेटतील, नवीन नाती जुळतील, काही जुनी चेहरे हरवतील, काही नाती तुटतील
काही नवीन शिकाल, काही नवीन सुरु कराल, जुनी जळमट निघून जातील, नवीन जळमट येतील
तुमचा स्वभाव बदलेल, तुमचं रूप बदलेल, जुने व्यासंग निघेल, तिथे नवे व्यसन जुडेल
यात काय बदलणार नाही तर ते तुमचं नाविन्य, तुमचं शरीर, एक तो आत्मा आणि तुमचा ध्यास नवीन शोधाचा

हे सर्व समजूनही या पुढं जे द्वंद्व उभं राहतं ते म्हणजे to be or not to be…that is the question
शोध घ्यावा कि न घ्यावा….

-प्रसाद देशपांडे